जगामध्ये ९९% लोकांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमीच घडत असते, ती म्हणजे, लहानपणापासून ते दुसऱ्या कोणासारखं तरी बनायचा प्रयत्न तरी करत असतात, किंवा त्यांना दुसऱ्या कोणासारखं तरी बनवायचा त्यांच्या आजूबाजूचे प्रयत्न करत असतात.
या सर्व धडपडीत जेव्हा १००% दुसऱ्या सारखं नाही बनता येईल त्यावेळी मंडळींच्या मनात ॲंग्झायटी म्हणजे चिंता व त्या चिंतेमुळे आलेली अस्वस्थता निर्माण होते.
या अस्वस्थतेमुळे तणाव निर्माण होतो.
या तणावाचा पर्यवसान वारंवार येणाऱ्या अपयशात होतं.
आणि अशा वारंवार अपयशांच्या नंतर जेव्हा अचानक यश हातात येतं तेव्हा ते सांभाळता येत नाही कारण यशा बरोबर आलेल्या जबाबदाऱ्या सांभाळणं हे जमत नाही.
या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोकांचे आयुष्य हे फक्त एक लढाई बनवून राहते जी अनेकदा हरणारी लढाई असते.
जर आयुष्याची ही लढाई जिंकणारी लढाई बनवायची असेल तर मात्र या सगळ्या गोष्टींचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे म्हणजे चिंता आणि त्यातून आलेली अस्वस्थता याचं नियंत्रण व्यवस्थापन आणि नियोजन कसं करायचं, तणावाचं नियंत्रण व नियोजन कसं करायचं, अपयश आलं तर त्याच्याकडे पाहण्याची आपली वृत्ती आणि त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा सुदृढ करायचा आणि प्रत्येक अपयशाला यशाकडे जाणारी पायरी कसं बनवायचं आणि या सर्वानंतर यश जेव्हा हाताला लागतं त्यावेळी यशाबरोबर येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पेलत यश टिकवून कसं ठेवायचं हे ज्या माणसाला आलं तो माणूस जगाची लढाई नक्कीच जिंकतो आणि त्यानंतर स्वतःची अशी छाप जगावर सोडतो म्हणजेच स्वतः नैसर्गिकपणे जगत लोकांना आपलं अनुसरण करण्याकरता उद्युक्त करू शकतो.
ज्या लोकांना अशा प्रकारे जगासमोर रोल मॉडेल म्हणून तयार होण्यात आणि उभं राहण्यात इंटरेस्ट असेल ती लोक आमचं हे लाईफ मॅनेजमेंटचं प्रशिक्षण नक्कीच घेतात आणि त्यानंतर आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती किंवा एक यशस्वी उद्योजक म्हणून उभे राहू शकतात.
या प्रशिक्षणात प्रथम एका दिवसाचं चिंता व्यवस्थापन याचं ऑफलाइन प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचा पुढे सहा आठवडे आठवड्यातून एकदा ऑनलाईन फॉलोअप घेतला जातो.
चिंता व्यवस्थापना नंतर येत ते तणाव व्यवस्थापन. मग येतो ते अपयश व्यवस्थापन आणि त्यानंतर येतं ते यशाचं व्यवस्थापन.
याही प्रशिक्षणांचा आराखडा असाच असतो म्हणजे एक दिवस ऑफलाइन प्रशिक्षण आणि नंतर सहा ऑनलाईन फॉलोअप सेशन.
या चार प्रशिक्षणांपैकी पहिले प्रशिक्षण म्हणजे चिंता व्यवस्थापन हे आम्ही शनिवार दिनांक २९ जून रोजी ऑफलाइन घेणार आहोत.
हे प्रशिक्षण दादर मुंबई येथे घेतले जाणार आहे.
प्रशिक्षणाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी असेल ज्यामध्ये दहा ते अकरा रजिस्ट्रेशन व सकाळचा नाश्ता होईल. नंतर अकरा ते दीड या वेळात या प्रशिक्षणाचा पूर्वार्ध पार पडेल. मग दीड ते अडीच या काळात जेवणाची सुट्टी असेल मात्र त्यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी एकमेकांची ओळख करून घेऊन एकमेकांशी चर्चा करून प्रशिक्षणातून कोणाला काय मिळालं हे समजून घेऊ शकतात. नंतर अडीच ते पाच या वेळात या प्रशिक्षणाचा उत्तरार्ध पार पडेल. त्यानंतर पाच ते सहा या काळात चहा नाश्त्या बरोबरच प्रशिक्षकां बरोबर चर्चा करणे ही शक्य होईल.
चिंता व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाच्या दिवशी अथवा पहिल्या ऑनलाइन फॉलोअप च्या दिवशी तणाव व्यवस्थापन या पुढच्या प्रशिक्षणाची माहिती देण्यात येईल.
चिंता व्यवस्थापन या प्रशिक्षणाची नेहमीची फी ७५००/- रुपये आहे, मात्र येत्या दोन दिवसात रजिस्टर करणाऱ्या मंडळींसाठी हे प्रशिक्षण नेहमीच्या फीच्या फक्त ४०% फी मध्ये म्हणजे फक्त ३०००/- रुपयांमध्ये घेणे शक्य होणार आहे.
याशिवाय आज आणि उद्या रजिस्टर करणाऱ्या मंडळींना फी मधल्या ६०% सुटी बरोबरच एक आकर्षक भेटही मिळणार आहे.
तेव्हा त्वरा करा आणि ताबडतोब सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून आपली फी फॉर्ममध्ये दिलेल्या क्यू आर कोड वर भरून रजिस्टर करून टाका.
https://forms.gle/EWS7tfV6CiYniRsEA


Author: admin
Chief Editor: Manilal B.Par Hindustan Lokshakti ka parcha RNI No.DD/Mul/2001/5253 O : G 6, Maruti Apartment Tin Batti Nani Daman 396210 Mobile 6351250966/9725143877