जय गजानन
अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा.
डोळ्यांचे पारणे फेडणारा एक नितांत सुंदर अनुभव.
गेल्या तीन वर्षांपासून आपण, भक्तांकडून लाडु साहित्य संकलित करुन, बरोब्बर गुरुपौर्णिमेनिमेच्याच दिवशी शेगांवी पोहचवून देत आहोत.. या वर्षी तर विक्रमी संकलन झाले.. 15 टन..
हे साहित्य आपण प्रत्यक्ष कुठे जमा करतो, हे पाहण्याचा योग मला स्वतःला या वर्षी.. म्हणजे कालच.. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आला..
आपण नेहमी शेगांवी जात असतो.. मंदिरातील सर्व चोख व्यवस्था अनुभवित असतो.. महाप्रसाद ग्रहण करीत असतो..
आनंद विहार, आनंद विसाव्यात मुक्काम करीत असतो.. तिथल्या स्वच्छ परीटघडीच्या चादरी, पिलो कव्हर्स, टाॅवेल्स् चा वापर करीत असतो.. तेथील भोजनालयात आपण नास्ता व भोजनाचा आनंद घेत असतो.. आणि इतकी निटनेटकी चोख व्यवस्था बघून अचंबित होत असतो...
पण हे तर पाण्यात तरंगणार्या हिमनगचाचे एक टोक आहे.. एक दशांश.. हे सर्व सुचारु पणे अव्याहत सुरु राहण्यासाठी या मागे एक फार मोठी.. अवाढव्य यंत्रणा.. समर्थ प्रेरणेने.. चोविस तास कार्यरत असते.. तो परिसर म्हणजे.. "अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा".. शेगांव पासून तीन एक किलोमीटर अंतरावर.. आकोट रोडवर..
थक्क होतो आपण तो विस्तीर्ण परिसर पाहून.. अनुभवून.. काय नाही माऊली तिथे?..
वेगवेगळे डिपार्टमेन्टस्.. अगदी खाणीतून आणलेल्या मार्बल्स् च्या कटींग, कार्व्हिंग पासून हा परिसर सुरु होते.. तर लाकडी फर्निचर.. वाहनांचे टायर्स.. यांत्रिक विभाग.. विद्युत विभाग.. भाजी पाला भंडार.. बटाटा कोल्ड स्टोरेज.. लाॅन्ड्री विभाग.. अजस्र धान्य भंडार.. व सर्वांचा कळस म्हणजे अद्ययावत यंत्र व्यवस्थेने सुसज्ज भली मोठी पाकशाळा.. कुठेही बाहेरील कोणालाही प्रवेश नाही.. हायजिन ची काळजी पराकोटीची..
लाडु तयार करण्याचा विभाग असो ची धान्य भंडार... कुठेही एकही मुंगी नाही की माशी नाही.. अगदी स्वच्छ.. स्वच्छता तर इतकी पराकोटीची, की सर्व इमारतींना बाहेरुन अग्नीशमन व्यवस्थेचे जे लाल लोखंडी पाईप असतात, त्यावरही धुळीचा एकही कण नाही माऊली.. धन्य आहे व्यवस्थापन विभाग.. शेकडो सेवेकरी सतत कार्यरत.. पण कोणी कोणाशी टाईमपास करत, गप्पा मारीत दिसत नाहीत.. कि कोणाचा आपापसात बोलण्याचा आवाज नाही.. प्रत्येक सेवेकरी आपापल्या नियोजित कामांत व्यस्त..
पाकशाळा तर इतकी अद्ययावत की, मोठाल्या स्टिम बाॅयलरवर काही मिनिटांत भात.. पोळ्यांचे तर यंत्रच.. हाॅट ऑईल ने कढया गरम होऊन दहा पंधरा मिनिटांत भाज्या शिजून तयार.. इथेच मंदिर, विहार, विसावा येथील स्वयंपाक तयार होऊन सप्लाय केल्या जातो.. ती वाहने देखील एकदम स्वच्छ..
विशेष म्हणजे इथे नाॅर्मली कमीत कमी एक लाख भक्तांसाठी स्वयंपाक बनविला जातो.. गुरुवार असेल, रविवार असेल, गुरुपौर्णिमा असेल.. अशा विशेष दिवशी दिड दोन ते अडीच लाख भक्तांसाठी स्वयंपाक तयार करण्यात येतो.. तो ही अगदी शांतपणे व शिस्तबद्ध पध्दतीने.. जय गजानन.. महाराजच सर्व करवून घेतात माऊली.. असो..
तिथेही सर्व सेवेकर्यांसाठी भोजनालय... आम्हालाही तिथे भोजन घेण्याची विनंती करण्यात आली.. तिथे एक टेबल खुर्ची असलेला कक्ष होता.. तिथे आम्हाला बसविण्यात आले.. जागेवर पूर्ण भोजन वाढण्यात आले.. आमचे ताटही आम्हाला स्वहस्ते उचलू देण्यात आले नाही.. कारण.. आम्ही त्यावेळी "देणगीदार" या कॅटॅगरीत होतो.. आपण भक्त आहोत महाराजांचे.. रांगेत लागून महाप्रसाद घेण्याची सवय आहे आपल्याला.. त्या मुळे त्या क्षणी अवघडल्या सारखे झाले आम्हाला.. पण तेथील शिस्त आम्हीही मोडू शकत नव्हतो..
आमच्या ट्रक मधील साहित्य, एक एक करुन उतरविण्यात आले.. वजन करण्यात आले.. आणि शिस्तित नियोजित जागी ठेवण्यात आले.. असो..
तर.. तेथील भाज्यांचे गोदाम एयर कंडिशन्ड.. आठ दिवस भाज्या खराब होणार नाहीत..
भक्तांच्या पोटात जाणारे प्रत्येक साहित्याचा कण अन् कण बारकाईने तपासला जातो.. चाळला जातो.. निवडला जातो.. मग ती साखर असो.. वा डाळ असो.. वा तांदूळ कींवा कडधान्ये.. अनेक सेवेकरी महिला हे काम सातत्याने व मन लावून करीत असतात.. ही व्यवस्था अगदी आवर्जून पाहण्यासारखी..
कणिक दळण्यासाठी एक महाकाय चक्की.. जवळून निरिक्षण करावी, तर आपल्या डोक्यावरील टोपी खाली पडेल.. हॅट्स ऑफ..
त्यात खूप उंचावरून पाईप द्वारे गहू खाली येतो.. त्याला जोडलेल्या सतत हलणार्या महाकाय पांच सहा चाळणीतून जात असतो.. खाली त्याला तीन भली मोठी पोती.. एका पोत्यात शुध्द कणिक.. दोन पोत्यात काडीकचरा जमा होत रहातो.. आणि विशेष म्हणजे कुठेही कणिकेचा एकही कण उडत नाही.. आश्चर्यच आहे.. अन्यथा चक्की म्हटली, तर कणिक तर इकडे तिकडे उडायलाच हवी ना माऊली?
लाॅन्ड्री विभाग ही इतका अजस्र.. की डोळे दिपून जातात.. मोठमोठाल्या वाॅशिंग मशीनस्.. ड्रायर्स्.. कपडे वाळविण्याची उन्हाळी, पावसाळी वेगवेगळी व्यवस्था.. इस्त्रीचे मोठमोठे रोलर्स्.. इकडून चुरगळलेली चादर किंवा पिलो कव्हर सरकविले, की खालून ते इस्त्री करुन बाहेर.. सेवेकरी मॅन्युअली घड्या करतात.. त्या देखील इतक्या व्यवस्थित, की एकही टोक घडीच्या बाहेर येणार नाही..
प्रत्येक वेगवेगळ्या इमारतींच्या आजूबाजूलाच सुंदर हिरवेगार बगिचे.. मोकळे मोठमोठे रस्ते.. पण कुठेही झाडाचे एकही वाळलेले, गळलेले पान नाही.. कोणी पाणीही टाकित नाही.. प्रत्येक झाडाच्या जवळून काळे पाईप्स्.. ड्रिप सिस्टिम.. कुठे झाडांत चिखल नाही.. तरीही झाडे टवटवीत.. पाण्याची बचत.. आणि ड्रेनेज चे पाणी शुद्ध करुन झाडांना.. ते ही वाया जायला नको..
बघता बघता सायंकाळचे सहा वाजले.. दिवसभर न बोलता कार्यरत सर्व महिला सेवेकरी मोठ्या भंडारात.. शिस्तीत.. रांगेत बसल्या.. सर्वांच्या हातात पितळी टाळ.. गळ्यात त्याचा रुंद कापडी पट्टा.. समोर पुरुष सेवेकरी टाळ मृदुंग घेऊन बसले.. छान खड्या आवाजात, लिड ॲन्ड फाॅलो पध्दतीने भजन सुरु झाले.. बघा माऊली.. संस्थान उत्तम मानसोपचार तज्ज्ञ देखील आहे.. काम करुन श्रमलेल्या जीवांना मानसिक रिलॅक्सेशन्.. मनाची मरगळ दूर करणारा.. शिण थकवा घालवणाला उत्तम उपचार.. ग्रेट.. असो..
ही सगळी व्यवस्था बघितली की लक्षात येतं.. कुठल्याही कामासाठी संस्थान कोणावरही अवलंबून नाही.. अगदी आनंद विसावा/ विहार मधील किरकोळ फर्निचर दुरुस्ती असो.. की नवीन फर्निचर बनविणे असो.. की प्लंबिंग चे काम.. किंवा मार्बल वर्क.. सगळ्या साठी संस्थान ची बॅक अप व्यवस्था तय्यार आहे..
शेगांव संस्थान सारखे शिस्तबद्ध.. स्वच्छ.. सुंदर.. काटेकोर संस्थान जगात कुठेच नसेल.. ज्यांना हे वैभव पाहता आलं.. ते खरोखरच भाग्यवान..
जय गजानन..
🙏🏼जय गजानन 🙏🏼
Author: admin
Chief Editor: Manilal B.Par Hindustan Lokshakti ka parcha RNI No.DD/Mul/2001/5253 O : G 6, Maruti Apartment Tin Batti Nani Daman 396210 Mobile 6351250966/9725143877