Explore

Search

August 30, 2025 12:29 pm

लेटेस्ट न्यूज़

કેતન પટેલ પ્રમુખ ए ભારતીય રાષ્ટ્રીય કોંગ્રેસપ્રદેશ કોંગ્રેસ સમિતિ, દમણ અને દીવ દ્વારા ૨૫/૦૮/૨૦૨૫ ના રોજ પ્રફુલભાઈ પટેલને પત્ર લખ્યો છે દમણ જિલ્લાને મહાનગર પાલિકામાં અપગ્રેડ કરવાનો પ્રસ્તાવ

Advertisements

नोक्टुरिया -ज्येष्ठ नागरिकांसाठी… खरे तर सर्वांसाठी! लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे.. ! Kusum Singhania

नोक्टुरिया -ज्येष्ठ नागरिकांसाठी… खरे तर सर्वांसाठी! लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे.. ! Kusum Singhania

🟢 🟢🟣🟣

नोक्टुरिया

ज्येष्ठ नागरिकांसाठी…
खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे.. !

नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते. झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना काय माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण आहे.

खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशय बिघडल्याची समस्या नाही. हे वयोमानानुसार वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते, कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास (पुरेसे पंपिंग) सक्षम नाही.

अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो. हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो. म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते. जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते. हे पाणी पुन्हा रक्तात येते. जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते. हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा टॉयलेटला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात. त्यानंतर, जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते, तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा लघवीला जावे लागते.

आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?

दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, तसे श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते. यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते. जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते…

यामुळेच प्रौढ आणि वृद्ध लोकांना नेहमी पहाटे ५-६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते. या अवस्थेत ते झोपेतच मृत्यू पावतात.

सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे. म्हणून शक्य झाले तर पायाचा भाग उंचावर राहील अशा पध्दतीने झोपावे.. उठावे लागले तरी पाणी प्यायचे टाळू नये..
खरे तर झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री उठल्यावर पुन्हा लघवी झाली की पुन्हा पाणी प्यावे!

नॉक्टुरियाला घाबरू नका. भरपूर पाणी प्या, कारण पाणी न पिल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.

तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे.
मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल. अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ टाळा!

हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा. घरातील जाणत्या तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना पाणी प्यायचा सल्ला द्या!
वारंवार उठावे लागते म्हणून पाणी प्यायचा कंटाळा तुम्हास हृदय घात किंवा लकवा भेट देऊन कायमचे उठवू शकते म्हणून रात्री किंवा दिवसा देखील पाणी प्यायचे टाळू नका!

admin
Author: admin

Chief Editor: Manilal B.Par Hindustan Lokshakti ka parcha RNI No.DD/Mul/2001/5253 O : G 6, Maruti Apartment Tin Batti Nani Daman 396210 Mobile 6351250966/9725143877

Leave a Comment

Advertisement
Advertisements
लाइव क्रिकेट स्कोर
कोरोना अपडेट
पंचांग
Advertisements